CSIBER शैक्षणिक संस्थेमध्ये एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

97

कोल्हापूर: छत्रपती शाहू इंस्टिट्यूट ऑफ बिझिनेस एज्युकेशन अँड रिसर्च, (CSIBER) येथे 10 जानेवारी 2020 रोजी “21 व्या शतकासाठी शास्वत विकास विषयांवरती आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजित करण्यात आले होते. या परीषदेला उत्तम प्रतिसाद मिळाला.

या परिषदेच्या अध्यक्ष स्थानी मा.श्री. ई.रवींद्रन (IAS) मेंबर सेक्रेटरी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ होते, व या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती डॉ . मल्लिनाथ कलशेट्टी (IAS) आयुक्त,‌ कोल्हापूर महानगर पालिका, मा.श्री. प्रशांत गायकवाड (SRO, MPCB), मा.श्री. रविंद्र आधळे (RO, MPCB), मा.श्री उप्पल शहा (मुख्य संपादक चिनीमंडी),मा.श्री. हेमंत शहा ,CSIBER चे विश्वस्त व सेक्रेटरी डॉ. आर ए शिंदे, संचालक डॉ. प्रदिप वायचळ, पर्यावरण व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. एस. डी. कदम, सर्व प्राध्यापक व कर्मचारी त्याच बरोबर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

या परिषदेमध्ये उद्योग प्रतिनिधी, नवोदित वैज्ञानिक, संशोधक विद्यार्थी, सरकारी अधिकारी आणि शैक्षणिक शास्त्रज्ञ यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला .पर्यावरण व्यवस्थापनातील एक अग्रणी शैक्षणिक संस्था असल्याने छत्रपती शाहू इंस्टिट्यूट ऑफ बिझिनेस एज्युकेशन अँड रिसर्च (CSIBER), कोल्हापूरने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) च्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करून यामध्ये शास्वत विकास विषयांवरती विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here