कोरोना: आर्थिक संकटातून वाचण्यासाठी क्यूबाच्या कारखान्यांमधून साखर उत्पादन सुरु

89

हवाना: कोरोना महामारी मुळे देशामध्ये अंशिक लॉकडाउन असूनही क्यूबाच्या 40 साखर कारखान्यांमध्ये साखर उत्पादनाचे काम सुरु आहे. सरकारला आर्थिक मदत मिळावी यासाठी, या कारखान्यांना सुरु ठेवण्यात आले आहे. कोरोना संकटामुळे देशातील पर्यटन व्यवसाय ठप्प झाला आहे, ज्यामुळे देशामध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी पैसा मिळतो.

क्यूबामध्ये शेती आणि कन्स्ट्रक्शन, माइनिंग ची कामे सुरु करण्यात आली आहेत. जेंणेकरुन साखर आणि निकेलची निर्यात करुन विदेशी पैसा मिळवू शकतील. क्यूबामध्ये कम्युनिस्ट संचालित सरकार आहे आणि हे सरकार सध्याचे संकट पाहून फूड प्रॉडक्शन आणि निर्यात होणार्‍या गोष्टींचे उत्पादन वाढवण्यावर भर देत आहे.

गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर मध्ये जेव्हा ऊसतोडणी सुरु झाली, तेव्हा क्युबा ने मे 2020 पर्यंत 1.5 मिलियन मेट्रीक टन कच्च्या साखरेच्या उत्पादनाचा विश्‍वास दाखवला होता ज्यामधून 800,000 टन निर्यातीसाठी असेल.

क्यूबामध्ये शुगर मोनोपोली कंपनी अजकुबा चे प्रवक्ता डायोनिस पेरेज यांनी संगितले की, देशातील साखर कारखाने परिस्थिती अनुकुल असेपर्यंत खुले राहतील. साखर हा क्यूबाचा खूप काळापासूनचा महत्वाचा उद्योग आहे

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here