क्युबातील साखर उद्योग करतोय आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष

हवाना: काही वर्षांपूर्वीपर्यंत जगातील इतर देशांतील साखर उद्योगाशी स्पर्धा करणारा क्युबातील साखर उद्योग सद्यस्थितीत आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करीत आहे. १६ व्या शतकात जेव्हा पहिल्यांदा स्पॅनिश वसाहतवाद्यांनी येथे ऊस लावला, तेव्हापासून बेटाचा साखर हा अविभाज्य घटक बनला. ऊस तोडणीसाठी अगणित आफ्रिकन कामगारांना येथे आणण्यात आले. नंतर देशात विद्रोहाचे वातावरण निर्माण झाले. जेव्हा येथे लोकांनी स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी आणि आपल्या देशाचे सार्वभौमत्व परत मिळवण्यासाठी स्पॅनिश लोकांविरोधात तलवारी उपसण्यात आल्या.

साखरेने क्युबामध्ये विकास आणि समृद्धी आणली. जेव्हा पहिल्या जागतिक युद्धानंतर साखरेच्या दरात वाढ झाली, तेव्हा क्युबातील साखर उद्योगाने खुप पैशांची कमाई केली. मात्र, काळाबरोबरच स्थिती बदलत गेली. आणि साखर उद्योगही यापासून लांब राहू शकला नाही. दशकापासून साखर उद्योगात सातत्याने घसरण होत आहे. क्युबामध्ये १९८० च्या दशकात ७ मिलियन टनाहून अधिक साखरेचे उत्पादन करण्यात आले होते. तर गेल्या हंगामात येथे केवळ ४,८०,००० टन साखरेचे उत्पादन झाले. या वर्षी ऊस आणि साखर उत्पादनाचे उद्दिष्ट आणखी कमी आहे. कारण क्युबामध्ये शतकापेक्षा अधिक काळातील सर्वात खराब पिक यंदा असल्याचे दिसून येत आहे.

एक वेळ अशी होती, जेव्हा क्युबा सर्वाधिक साखर निर्यात करणाऱ्या देशांमध्ये सहभागी होता. मात्र, हे पहिले वर्ष आहे की, जेव्हा क्युबाने उत्पादनातील घसरणीमुळे साखर निर्यात करण्याची कोणतीही योजना तयार केलेली नाही. अमेरिकेने निर्बंध लागू केल्यानंतर सर्वाधिक नुकसान क्युबाचे झाले आहे. दरवर्षी नोव्हेंबर ते मेपर्यंत ऊस तोडणीचा कालावधी असतो. मात्र, काही आठवड्यांपासून क्युबा पेट्रोल आणि डिझेलच्या टंचाईला सामोरे जात आहे. त्यामुळे वाहनचालक आणि साखर कामगार या दोन्ही घटकांना फटका बसला आहे. कधी कधी डिझेलची प्रतीक्षा करताना एक, दोन अथवा तीन दिवसही प्रतीक्षा करावी लागत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here