ऊसासोबत करा कांद्याची शेती, पूरक पिकांनी वाढेल उत्पन्न

कासगंज : उसासोबत कांद्याची शेती करून पूरक पिकांच्या माध्यमातून शेतकरी अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतात. यासाठी नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यापासून जानेवारीपर्यंतचा कालावधी अनुकूल असते. तर हे पिक मार्चच्या अखेरच्या आठवड्यापासून एप्रिलच्या सुरुवातीपर्यंत हाती येईल. पूरक पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावे असे आवाहन शेतीतज्ज्ञांनी केले आहे.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड केली जाते. यामध्ये कांद्याचे उत्पादन घेणे शेतीला अधिक लाभ देणारे ठरते. शेतकऱ्यांना कांदा रोपांची नर्सरी तयार करण्यातही फायदा मिळू शकेल. नर्सरीत ४५ ते ५० दिवसांत रोपे तयार होतात. मार्च, एप्रिलपर्यंत कांदा पिक तयार होवून काढणीस येते. प्रती एकर ६० ते ७० क्विंटल कांद्याचे उत्पादन होऊ शकते. यातून शेतकरी अधिक उत्पन्न मिळवू शकते. जिल्ह्यात जवळपास १३० हेक्टरमध्ये कांदा पिक घेतले जाते. उद्यान विभागाकडून यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. एकिकृत बागायती विकास मिशनद्वारे मोफत बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी ८० हेक्टरचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे, असे प्रभारी जिल्हा उद्यान अधिकारी सुबोध कुमार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here