ऑक्टोबरमध्ये फिरणार साखर कारखान्यांची चक्रे

112

अमरोहा : ऑक्टोबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात सर्व साखर कारखान्यांनी ऊस गळीत हंगाम सुरू करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे ऊस विभाग आणि साखर कारखान्यांच्या प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. कारखान्यांमध्ये यंत्रसामुग्रीच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. ऊस क्षेत्र वितरणाची प्रक्रियाही सुरू आहे. काही ऊस खरेदी केंद्रंमध्ये बदल केला जाईल अशी शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार काही नवी केंद्रेही सुरू होतील. १५ ऑक्टोबरपासून ऊस खरेदी केद्रांची यादी जाहीर केली जाईल.

अमरोहा जिल्ह्यात ७० हजार हेक्टर क्षेत्रात ऊस शेती केली जाते. जिल्ह्यातील एक लाख शेतकरी ऊस पिकावर अवलंबून आहेत. जिल्ह्यात हेच पिक मुख्य आहे. तीन साखर कारखाने जिल्ह्यात असून इतर जिल्ह्यातील कारखान्यांकडूनही येथील ऊस नेला जातो. वीस ऑक्टोबरपासून सर्व कारखाने सुरू करण्यावर भर देण्यात आला आहे. यंदा साधारणतः वीस ते २५ केंद्र बदलले जातील अशी शक्यता आहे. तर दहा ते पंधरा नवी केंद्रे सुरू केली जाणार आहेत.

जिल्हा ऊस अधिकारी हेमेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले की, गळीत हंगाम वेळेवर सुरू करण्याला प्राधान्य दिले आहे. ऑक्टोबरच्या अखेरच्या आठवड्यात सर्व कारखान्यांचे गाळप सुरू होईल. यासाठी सरकारच्या स्तरावरुनही प्रयत्न सुरू आहेत. ऊस आयुक्तांकडे ऊस विकास समितीच्या माध्यमातून ऊस खरेदी केंद्रांचे प्रस्ताव पाठविले जात आहेत. पंधरा ऑक्टोबरपासून ऊस खरेदी केंद्रांची यादी जाहीर होईल अशी शक्यता आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here