ओडिसाला 10 ते 11 नोव्हेंबरला चक्रीवादळाचा धोका

भूवनेश्‍वर : सोमवारी (दि.4) उत्तर अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र (लोपार) निर्माण झाल्याने बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ उत्तर ओडिसा किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता असून 10 ते 11 नोव्हेंबर दरम्यान जगत्सिंहपूर ते बालेश्‍वर दरम्यान धडकण्याची शक्यता आहे.

आयएनसीओएस विन्ड मॉडेल्सच्या अंदाजानुसार कमी दाबाची पट्टा उष्णकटिबंधीय चक्रीवादळाच्या रुपाने ओडिसा किनारपट्टीकडे जाईल. महत्वाचे म्हणजे, ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ होतात.  एकीकडे थंड असणार्‍या अरबी समुद्रात क्यार आणि महा ही दोन चक्रीवादळे झाली. तर दुसरीकडे यावर्षी चक्रीवादळे होणार्‍या बंगालचा उपसागर त्या तुलनेत शांत होता. यंदा मे महिन्यातील फॅनी वादळानंतर बंगालचा उपसागर शांतच राहिला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here