डी. वाय. कारखाना प्रती टन ३२०० रुपये देणार : अध्यक्ष, आमदार सतेज पाटील

कोल्हापूर : येथील डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याने चालू वर्षीही एफआरपीपेक्षा जादा दर देण्याची परंपरा कायम राखली आहे. कारखाना यंदा गाळपास येणाऱ्या उसाला ३२०० रुपये दर देणार आहे अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे दिली. कारखान्याने चालू गळीत हंगामात उत्पादकांना एफआरपीपेक्षा प्रती टन १८० रुपये जादा दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. गतवर्षीदेखील कारखान्याने प्रती टन १४७ रुपये जादा दिले होते.

अध्यक्ष तथा आमदार पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याची चालू हंगामाची एफआरपी प्रती टन ३,७६२ रुपये आहे. तोडणी, वाहतूक खर्च ७४२ रुपये आहे. त्यामुळे निव्वळ एफआरपी ३,०२० रुपये होतात. मात्र शेतकऱ्यांना १८० रुपये जादा दिले जात आहेत. कारखान्याने २ डिसेंबरअखेर १,१५,०१० मे.टन उसाचे गाळप करून १,०६,७५० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. चालू वर्षी कारखान्याचे ५.५० लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. यावेळी कारखान्याचे संचालक, कार्यकारी संचालक जयदीप पाटील, सेक्रेटरी नंदू पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here