‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

मंगळवार – ०३ सप्टेंबर २०१९

डोमेस्टिक मार्केट: आज मार्केट मध्ये मागणी चांगली दिसली. महाराष्ट्रात, कारखान्यांचे भाव ३३०० ते ३४०० रुपये प्रति क्विंटल ने ओपन झाले तर रिसेल चे भाव ३२५० ते ३३५० रुपये होते. उत्तर प्रदेश मध्ये विक्री ३३४० ते ३३९० रुपयात होत आहे. रिसेल चे भाव ३४२० ते ३४७० रुपये आहेत. गुजरात मध्ये S/30 चा व्यापार ३३२० ते ३४१० रुपये होता तर, तामिळनाडू मध्ये साखरेची विक्री GST सोडून ३४४० ते ३५४५ रुपये मध्ये झाली.

इंटरनॅशनल मार्केट: येथील बाजार आज स्थिर होता. लंडन पांढऱ्या साखरेचे भाव ३०८.७० डॉलर तर यु.एस साखरेचा व्यापार ११.३५ सेंट्स मध्ये झाला. कच्च्या साखरेचे FOB इंडिकेशन ३३५ ते ३४० डॉलर आणि भारतीय पांढऱ्या साखरेचे भाव ३४८ ते ३५३ डॉलर राहिले. एक्स फॅक्टरी अनुसार कच्च्या साखरेची मागणी २०८०० ते २१००० रुपये प्रति मेट्रिक टन आणि पांढरी साखर २१७०० ते २२००० रुपये प्रति मेट्रिक टन होती.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार ७२.३४ मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार ४.१ मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स ३९३१ रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI ५४.२४ डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स ८४० अंकांनी पडून ३६४९१ अंकांवर तर एनएसई निफ्टी २४३ अंकांनी खाली येऊन १०७७९ वर थांबले.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here