‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

सोमवार – ५ ऑगस्ट २०१९

डोमेस्टिक मार्केट: आज मार्केट मध्ये साखरेची मागणी मिश्रित राहिली. महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस आणि पूर परिस्थितीमुळे लोडिंग थांबविण्यात आले आहे. महाराष्ट्रातील कारखान्यांचे भाव ३१०० ते ३१५० रुपये प्रति क्विंटल ने ओपन झाले तर रिसेल चे भाव ३०८० ते ३१४० रुपये होते. उत्तर प्रदेश मध्ये विक्री ३३४० ते ३३८० रुपयात होत आहे. रिसेल चे भाव ३३२० ते ३३६० रुपये आहेत. गुजरात मध्ये S/30 चा व्यापार ३१६० ते ३२१० रुपये होता तर, तामिळनाडू मध्ये साखरेची विक्री GST सोडून ३३०० ते ३३५० रुपये मध्ये झाली.

इंटरनॅशनल मार्केट: येथील बाजार आज स्थिर राहिला. लंडन पांढऱ्या साखरेचे भाव ३२२.७० डॉलर तर यु.एस साखरेचा व्यापार ११.९६ सेंट्स मध्ये झाला.
कच्च्या साखरेचे FOB इंडिकेशन ३२५ ते ३३० डॉलर आणि भारतीय पांढऱ्या साखरेचे भाव ३४० ते ३४५ डॉलर राहिले.

एक्स फॅक्टरी अनुसार कच्च्या साखरेची मागणी १९८०० ते २०३०० रुपये प्रति मेट्रिक टन आणि पांढरी साखर २०७५० ते २१००० रुपये प्रति मेट्रिक टन होती.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार ७०.७१ मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार ३.८ मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स ३८९८ रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI ५५ डॉलर होते.

इक्विटी : बीएसई सेंसेक्स ४१८ अंकांनी खाली येऊन ३६६९९ अंकांवर तर एनएसई निफ्टी १३५अंकांनी घसरून १०८६२ अंकांवर बंद झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here