‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

गुरुवार – ५ सप्टेंबर २०१९

डोमेस्टिक मार्केट: लिफ्टिंग प्रेशर असल्याने आज देशभरातील बाजारात शांतता दिसून आली. महाराष्ट्रात कारखान्यांचे भाव ३२३० ते ३३४० रुपये प्रति क्विंटल ने ओपन झाले तर रिसेल चे भाव ३२०० ते ३३०० रुपये होते. उत्तर प्रदेश मध्ये विक्री ३२९० ते ३४२० रुपयात होत आहे. रिसेल चे भाव ३३८० ते ३४२० रुपये आहेत. गुजरात मध्ये S/30 चा व्यापार ३२९० ते ३३९० रुपये होता तर, तामिळनाडू मध्ये साखरेची विक्री GST सोडून ३४४० ते ३५४५ रुपये मध्ये झाली.

इंटरनॅशनल मार्केट: येथील बाजार आज स्थिर होता. लंडन पांढऱ्या साखरेचे भाव ३०३.७० डॉलर तर यु.एस साखरेचा व्यापार ११.०५ सेंट्स मध्ये झाला. कच्च्या साखरेचे FOB इंडिकेशन ३३५ ते ३४० डॉलर आणि भारतीय पांढऱ्या साखरेचे भाव ३४८ ते ३५३ डॉलर राहिले. एक्स फॅक्टरी अनुसार कच्च्या साखरेची मागणी २०८०० ते २१००० रुपये प्रति मेट्रिक टन आणि पांढरी साखर २१७०० ते २२००० रुपये प्रति मेट्रिक टन होती.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार ७१.८६ मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार ४.०९ मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स ४०४६ रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI ५६.२३ डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स ८०.३२ अंकांनी खाली येऊन ३६६४४ अंकांवर तर एनएसई निफ्टी ३.२५ अंकांनी वर येऊन १०८४७ वर थांबले.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here