‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

94

शुक्रवार – १३ सप्टेंबर २०१९

डोमेस्टिक मार्केट: आठवड्यानंतर देशभरातील साखरेची विक्री चांगली राहिली. दुसऱ्या सत्रात बऱ्याच कारखान्यांनी आपआपला सेल बंद ठेवला.

महाराष्ट्रात S/30 साखरेचा व्यापार ३१५० ते ३२३० रुपये राहिला तर M/30 चा व्यापार ३२९० ते ३३७५ रुपये राहिला.
उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार ३३७५ ते ३४५० रुपये होता.
गुजरात मध्ये S/30 साखरेचा व्यापार ३२०५ ते ३२३० रुपये तर M/30 चा व्यापार ३३२५ ते ३३७० रुपये होता.
कोलकाता मध्ये M/30 चा व्यापार ३७५० ते ३७८० रुपये होता.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार ३३२५ ते ३५२५ रुपये होता तर M/30 चा व्यापार ३४२५ते ३५२५ रुपये होता.

*दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.

इंटरनॅशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर डिसेंबर मंथ कॉन्ट्रॅक्ट ३१५.७ डॉलर राहिला तर यु एस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट १०.८३ डॉलर वर होता. निर्यात योजना घोषित होताच निर्यात करण्याच्या पांढऱ्या साखरेचा व्यापार सुरु होण्याची अपेक्षा आहे.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार ७१ मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार ४.०६ मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स ३९४१ रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI ५५.४५ डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स २८० अंकांनी वर येऊन ३७३८४ अंकांवर तर एनएसई निफ्टी ९३ अंकांनी वर येऊन ११०७५ वर थांबले.

 

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here