‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

सोमवार – १९ ऑगस्ट २०१९

डोमेस्टिक मार्केट: आज मार्केट स्थिर राहिले. महाराष्ट्रात, कारखान्यांचे भाव ३११० ते ३१६० रुपये प्रति क्विंटल ने ओपन झाले तर रिसेल चे भाव ३१०० ते ३१५० रुपये होते. उत्तर प्रदेश मध्ये विक्री ३३४० ते ३३८० रुपयात होत आहे. रिसेल चे भाव ३३२० ते ३३६० रुपये आहेत. गुजरात मध्ये S/30 चा व्यापार ३२४० ते ३३७० रुपये होता तर, तामिळनाडू मध्ये साखरेची विक्री GST सोडून ३४०० ते ३४५० रुपये मध्ये झाली.

इंटरनॅशनल मार्केट: येथील बाजार आज स्थिर होता. लंडन पांढऱ्या साखरेचे भाव ३१२.२० डॉलर तर यु.एस साखरेचा व्यापार ११.५४ सेंट्स मध्ये झाला. कच्च्या साखरेचे FOB इंडिकेशन ३२५ ते ३३० डॉलर आणि भारतीय पांढऱ्या साखरेचे भाव ३४० ते ३४५ डॉलर राहिले. एक्स फॅक्टरी अनुसार कच्च्या साखरेची मागणी २०२०० ते २०५०० रुपये प्रति मेट्रिक टन आणि पांढरी साखर २१५०० ते २१८०० रुपये प्रति मेट्रिक टन होती.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार ७१.४० मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार ३.९९ मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स ३९३१ रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI ५५.०९ डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स ५२अंकांनी वाढून ३७४०२ अंकांवर तर एनएसई निफ्टी ६ अंकांनी वर येऊन ११०५३ वर थांबले.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here