‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

84

मंगळवार – २७ ऑगस्ट २०१९

डोमेस्टिक मार्केट: सप्टेंबर महिन्याच्या कोटाच्या घोषणेची वाट पाहता देशभरातील बाजारपेठेत शांतता दिसून येत आहे. महाराष्ट्रात, कारखान्यांचे भाव ३११० ते ३१३० रुपये प्रति क्विंटल ने ओपन झाले तर रिसेल चे भाव ३१०० ते ३१२० रुपये होते. उत्तर प्रदेश मध्ये विक्री ३२३० ते ३३७० रुपयात होत आहे. रिसेल चे भाव ३३१० ते ३३५० रुपये आहेत. गुजरात मध्ये S/30 चा व्यापार ३१८० ते ३३०० रुपये होता तर, तामिळनाडू मध्ये साखरेची विक्री GST सोडून ३३५० ते ३४५५ रुपये मध्ये झाली.

इंटरनॅशनल मार्केट: येथील बाजार आज स्थिर होता. लंडन पांढऱ्या साखरेचे भाव ३०९.८ डॉलर तर यु.एस साखरेचा व्यापार ११.४३ सेंट्स मध्ये झाला. कच्च्या साखरेचे FOB इंडिकेशन ३२५ ते ३३० डॉलर आणि भारतीय पांढऱ्या साखरेचे भाव ३४० ते ३४५ डॉलर राहिले. एक्स फॅक्टरी अनुसार कच्च्या साखरेची मागणी २०२०० ते २०५०० रुपये प्रति मेट्रिक टन आणि पांढरी साखर २१५०० ते २१८०० रुपये प्रति मेट्रिक टन होती.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार ७१.४७ मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार ४.१ मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स ३८८५ रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI ५४.१८ डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स १४७ अंकांनी वाढून ३७६४१ अंकांवर तर एनएसई निफ्टी ४८ अंकांनी वर येऊन १११०५ वर थांबले.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here