‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

शुक्रवार – ३० ऑगस्ट २०१९

डोमेस्टिक मार्केट: सप्टेंबर महिन्यासाठी मंथली रिलिझ ऑर्डरच्या घोषणेच्या प्रतीक्षेत आज बाजारपेठ शांत होती. तथापि सप्टेंबर महिन्यात 19.5 लाख मेट्रिक टन  कोटा जाहीर झाल्यानंतर तसेच सणाच्या हंगामामुळे बाजारपेठेतील मागणी सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात, कारखान्यांचे भाव ३१३० ते ३१७० रुपये प्रति क्विंटल ने ओपन झाले तर रिसेल चे भाव ३१२० ते ३१६० रुपये होते. उत्तर प्रदेश मध्ये विक्री ३२६० ते ३३९० रुपयात होत आहे. रिसेल चे भाव ३३३० ते ३३६० रुपये आहेत. गुजरात मध्ये S/30 चा व्यापार ३२०० ते ३३२० रुपये होता तर, तामिळनाडू मध्ये साखरेची विक्री GST सोडून ३४०० रुपये मध्ये झाली.

इंटरनॅशनल मार्केट: निर्यात धोरणाच्या घोषणेनंतर येथील बाजारात काही प्रमाणात हालचाल झाली. लंडन पांढऱ्या साखरेचे भाव ३०३.४० डॉलर तर यु.एस साखरेचा व्यापार ११.१८ सेंट्स मध्ये झाला. कच्च्या साखरेचे FOB इंडिकेशन ३३५ ते ३४० डॉलर आणि भारतीय पांढऱ्या साखरेचे भाव ३४८ ते ३५३ डॉलर राहिले. एक्स फॅक्टरी अनुसार कच्च्या साखरेची मागणी २०८०० ते २१००० रुपये प्रति मेट्रिक टन आणि पांढरी साखर २१७०० ते २२००० रुपये प्रति मेट्रिक टन होती

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार ७१.४५ मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार ४.१६ मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स ४००३ रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI ५५.९१ डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स २६३अंकांनी वाढून ३७०३३२ अंकांवर तर एनएसई निफ्टी ७४ अंकांनी  वर येऊन ११०२३ वर थांबले.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here