‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

सोमवार १५ जुलै २०१९

डोमेस्टिक मार्केट: आज आठवड्याच्या सुरवातीला देशातील मार्केट स्थिर राहिले. महाराष्टातील कारखान्यांचे भाव ३१०० ते ३१४० रुपये प्रति क्विंटल ने ओपन झाले तर रिसेल चे भाव ३०३० ते ३०७५ रुपये होते. उत्तर प्रदेश मध्ये विक्री ३१८० ते ३३१० रुपयात होत आहे. रिसेल चे भाव ३१८५ ते ३३१० रुपये आहेत. गुजरात मध्ये S/30 चा व्यापार ३१०० ते ३१४० रुपये होता तर, तामिळनाडू मध्ये साखरेची विक्री GST सोडून ३१६० ते ३२०० रुपये मध्ये झाली.

इंटरनॅशनल मार्केट: येथील बाजार आज शांत राहिला. लंडन पांढऱ्या साखरेचे भाव २९८ डॉलर तर यु.एस साखरेचा व्यापार ११.९९ सेंट्स मध्ये झाला.

कच्या साखरेचे FOB इंडिकेशन ३३६ ते ३३८ डॉलर आणि भारतीय पांढऱ्या साखरेचे भाव ३५२ ते ३५५ डॉलर राहिले.

एक्स फॅक्टरी अनुसार कच्या साखरेची मागणी २१००० ते २१३०० रुपये प्रति मेट्रिक टन आणि पांढरी साखर २२००० ते २२२०० रुपये प्रति मेट्रिक टन होती.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार ६८. ५२ मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार ३.७ मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स ४१५९ रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI ६०.६७ डॉलर होते

इक्विटी : बीएसई ३० सेंसेक्स १६० अंकांनी वाढून ३८८९३ अंकांवर तर एनएसई निफ्टी ३५ अंकांनी घसरून ११५८८ अंकांवर बंद झाले.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here