‘डालमिया भारत शुगर’ ने डालमिया संजीवनी ब्रांड अंतर्गत हर्बल सैनिटाइजर केले लॉन्च..

कोलकाता: भारतातील सर्वात मोठया साखर कंपन्यांपैकी एक, डालमिया भारत शुगर एंड इंडस्ट्रीज लिमिटेड, ने सैनिटाइजर सेगमेंट मध्ये आपली उपस्थिती अधिक मजबूत करण्यासाठी ‘डालमिया संजीवनी’ ब्रांड नावांतर्गत हर्बल हैंड सैनिटाइजर लॉन्च केले. ‘डब्ल्यूएचओ’ च्या दिशानिर्देशांतर्गत ‘डालमिया संजीवनी’ चे निर्माण करण्यात आले आहे. हा 100 टक्के संयंत्र आधारित, प्राकृतिक आणि जैविक सैनिटाइज़र आहे. Covid -19 महामारीशी लढण्यासाठी डालमिया भारत शुगर ने या वर्षी सैनिटाइजर चे उत्पादन सुरू केले होते.

महत्वाचे सांगायचे तर, डालमिया भारत शुगर महामारी दरम्यान समाजाच्या प्रति असीम निस्वार्थ सेवेच्या रूपात सरकारी रुग्णालये आणि पोलिसांना मोफत सैनिटाइजर वितरित करत आहे. कंपनी सध्या जवाहरपुर आणि निगोही (उत्तर प्रदेश) आणि महाराष्ट्र मध्ये कोल्हापुर च्या प्लांटमध्ये सैनिटाइजर ची निर्मिती करत आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here