इथेनॉल उत्पादन क्षमता दुप्पट करण्याची दालमिया भारत शुगरची तयारी

143

नवी दिल्ली : दालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रीज लिमिटेडने जानेवारी २०२२ पर्यंत आपली इथेनॉल उत्पादन क्षमता दुप्पट करून वार्षिक १५ कोटी लिटरवर नेण्याची तयारी सुरू केली आहे. कंपनी सद्यस्थितीत वार्षिक आठ कोटी लिटर इथेनॉल उत्पादन करते. कंपनीने मंगळवारी आपल्या माहितीपत्रकात सांगितले की, जवाहरपूर आणि निगोही (उत्तर प्रदेश) आणि कोल्हापूर (महाराष्ट्र) येथील युनिटमध्ये ही उत्पादन क्षमता वाढ केली जाईल. उत्तर प्रदेशमधील रामगड येथे नवी डिस्टीलरी स्थापन करण्यात येणार आहे.

कंपनीने सांगितले की, केंद्र सरकारने २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण सध्याच्या ८ टक्क्यांवरून २० टक्क्यांपर्यंत वाढविण्याच्या जाहीर केलेल्या धोरणाचा एक भाग म्हणून कंपनीने ही नवी योजना आखली आहे. भारतीय मोटार वाहन उद्योगात कार्बन उत्सर्जन कमी होईल. याशिवाय सरकारची साखर निर्यातीवरील अनुदानाच्या प्रश्नातूनही सुटका होईल.
डब्ल्यूटीओच्या नियमांनुसार, भारत २०२३ नंतर साखर निर्यातीवर अनुदान देऊ शकणार नाही.

इथेनॉलच्या मागणीत वाढ झाल्याने साखर उत्पादक कंपन्यांना आपल्या उत्पादनांत, जैव इंधन उत्पादनांच्या खपात वाढ करण्याची संधी मिळेल. याचा फायदा साखर उद्योगाला होईल. आगामी चार-पाच वर्षात साखरेची मागणी आणि पुरवठ्यात समतोल साधला जाईल असे कंपनीचे म्हणणे आहे. इथेनॉल क्षमतेत वाढीसोबतच कंपनी १,५०,००० टन साखर इथेनॉल उत्पादनासाठी वापरेल. सध्या ६०,००० टन साखरेचा रस इथेनॉल उत्पादनासाठी वापरला जातो. सध्याच्या हंगामात दालमिया भारत शुगरने ३१ मे २०२१ पर्यंत ६६,००० टन साखर निर्यात केली आहे. गेल्यावर्षी या हंगामात १,९२,००० साखर निर्यात करण्यात आली होती.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here