बाजपूरमध्ये साखर कारखाना कामगारांचे धरणे आंदोलन

काशीपूर, उत्तराखंड: दसर्‍यापूर्वी कर्मचार्‍यांची सुट्टी आणि बोनस ची थकबाकी भागवण्यासह 14 सूत्रीय मागण्यांबाबत साखर कारखान्याशी संबंधीत पाच संघटनांच्या संयुक्त विद्यमाने कारखाना व्यवस्थापनाविरोधात तीन तासांचे धरणे आंदोलन करण्यात आले . मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर एक नोव्हेंबरला टूल डाउन संपाचा इशारा दिला. कारखान्याच्या जीएम यांनी कामगारांच्या मागण्या शासनासमोर ठेवून त्या सोडवल्या जातील असे अश्‍वासन दिले.

सोमवारी साखर कारखाना कामगारांनी तराई साखर कारखाना मजुर यूनियन, साखर कारखाना मजूर सभा, जिल्हा साखर कारखाना कर्मचारी यूनियन, साखर उद्योग कर्मचारी ट्रेड यूनियन तसेच जिल्हा सहकारी आसवनी श्रमिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशासकीय भवनावर धरणे आंदोलन सुरु केले. धरणे आंदोलनावर तराई साखर कारखाना मजुर यूनियनचे महामंत्री वीरेंद्र सिंह मुख्य लेख़ाकार यांच्या कार्यपद्धतीवर भडकले. त्यांनी सांगितले की, साखर कारखान्यांच्या मजुरांना अधिकारांपासून वंचित ठेवण्यात आले आहे, पण अधिकारी आपला खर्च आणि भत्ते यावर कोणतेही नियंत्रण ठेवत नाहीत. यावर जीएम प्रकाश चंद म्हणाले की, कर्मचार्‍यांच्या योग्य मागण्या शासनास्तावर नेवून त्यांचे निराकरण केले जाईल. आशा आहे की लवकरच कर्मचार्‍यांच्या मागण्या पूर्ण होतील.

यावेळी रामौतार, विरेंद्र सिंह, यशपाल सिंह, विशेष शर्मा, करन सिंह, कुलदीप सिंह, जफर अली, धीरज, सुखदेव सिंह, गुरदयाल सिंह, गुरमीत सिंह सिंधू आदी कर्मचारी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here