टोळ दलाने केले ऊसाच्या पिकाचे नुकसान

अंबिकापुर :सरगुजा जिल्ह्यातील लुंड्रा विकासखंड येथील गाव पडौली च्या काही शेतांमध्ये संध्याकाळी टोळ दिसल्याने शेतकर्‍यांची झोप उडाली आहे. घाबरलेल्या शेतकर्‍यांनी क्षेत्रातील लोकप्रतिनिधी आणि कृषी विभागाचे मैदानी कर्मचार्‍यांना अवगत केले. पंचायतीकडून रात्रीतच फॉगिंग करण्यात आले. सकाळपासूनच कृषी विभागाकडून सातत्याने किटकनाशक फवारणी केली जात आहे. स्थानिक स्तरावरुन टोळ नियंत्रणासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.

विकासखंड येथील पडौली गवातील ऊसाच्या शेतामध्ये शुक्रवारी संध्याकाळी मोठ्या प्रमाणात टोळ दिसल्याने शेतकर्‍यांची झोप उडाली होती. हे टोळ दल राज्यातील अनेक ऊस पीकांचे नुकसान करेल अशी शक्यता वाटत होती. पण यांचा फैलाव मोठ्या क्षेत्रामध्ये नसल्याने तसे हे टोळ संख्येतही आपेक्षेपेक्षा कमी असल्याने थोडा दिलसा मिळाला आहे. रात्रीतच पंचायतीकडून फॉगिंग मशीनचा वापर करुन शेतामध्ये मोठा धूर करण्यात आला, ज्यामुळे टोळ तिथून उडून गेले. रात्री मैदानी कर्मचार्‍यांकडून सूचना मिळाल्यानुसार जिल्हाधिकारी संजीव झा यांनी उपसंचालक कृषी एमआर भगत यांच्या नेतृत्वामध्ये कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या एका टीमला कीटकनाशक आणि जरुरी यंत्रांसह प्रभावित गावात पाठवले. अंधार असल्याने टोळ दिसले नाहीत. पण कृषी विभागाच्या टीमला प्रभावित क्षेत्रात तैनात राहण्यास सांगितले. सकाळी औषध फवारणी करण्यात आली. सातत्याने कीटकनाशकांची फवारणी केल्यानंतर टोळांची संख्या कमी झाली. पण त्यांचा फैलाव आसपासच्या गावामध्ये असल्याने नुकसान अधिक होवू शकते.

पडोली गावात टोळ दल आल्याच्या सूचनेवरुन शनिवारी आमदार डॉ. प्रीतम राम, जिल्हा पंचायत अध्यक्ष मधु सिंह, जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष आणिजिल्हा पंचायत उपाध्यक्ष राकेश गुप्ता प्रभावित क्षेत्रामध्ये पोचले. टोळांची संख्या अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे त्यांनी सांगितले. हे टोळ स्थानिक आहेत. तरीही त्यांच्यावर नियंत्रणासाठी कृषी विभागाची नजर आहे. त्यांनी सांगितले की, ऊसाच्या ज्या शेतांवर दुपानंतर टोळ बसले होते, तिथली पाने टोळांनी खाल्ली आहेत. निरीक्षणादरम्यान जनपद अध्यक्ष गंगाराम,उपाध्यक्ष वीरभद्र सिंह यांच्यासह क्षेत्रीय पंचायत प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

पडौली गावात शुक्रवारी संध्याकाळपासून ऊसाच्या शेंतात असणार्‍या टोळ दलांद्वारा ऊसाच्या पानांमधील भाग खाल्ला आहे. ते मोठ्या गतीने ऊस पीकाचे नुकसान करत आहेत. जिल्हा काँग्रस कमिटीचे अध्यक्ष व जिल्हा पंचायत उपाध्यक्ष राजेश गुप्ता यांच्यानुसार, टोळांनी ऊसाच्या रोपांचा वरचा भाग खाल्ला आहे. टोळ दल जर ऊसाची शेती सोडून तांदळाच्या शेतीमध्ये पोचले तर तांदळाच्या पीकाचे अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

कित्येक राज्यांमध्ये पीके नष्ट करणार्‍या टोळ दलांशी यांचा संबंध नाही पण तरीही 24 तासाच्या आत जितके नुकसान टोळांनी केले आहे, त्यामुळे चिंता अधिक वाढली आहे. बहुसंख्य टोळ वयस्क आहेत आणि लवकरच त्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. कॅबिनेट मंत्री सिंहदेव यांनी टोळांच्या उपस्थितीची सूचना गंभीरपणे घेतली आहे. त्यांच्या निर्देशावर लोकप्रतिनिधी आणि कृषी विभाग सजग झाला आहे. प्रभावित शेतकर्‍यांच्या पीकांची नुकसान भरपाई देण्यासाठीही निर्देश दिले आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here