बीडमध्ये पावसामुळे ऊसाच्या पिकाचे नुकसान

185

बीड : येथील वडवणी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात खरीप पीक भरभरुन आले आहे. पण बिड जिल्ह्यात सुरुवातीपासूनच पावसाने सातत्याने आपली हजेरी लावल्यामुळे मंगळवारी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच बीड जिल्ह्यात मंगळवारी संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे हजारो हेक्टरमधील ऊस पीकाचेही मोठे नुकसान झाले आहे.

सोमवारी नंतर लगेचच मंगळवारी ही जोरदार वार्‍यासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे तालुक्यातील मामला, चिचोंटी, साळींबा, देवडी, काडिवडगाव, मोरेवाडीसह अनेक गावात मोठा पाऊस झाला. त्यामुळे येथील मुख्य पीक ऊसाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

जोरदार पाऊस झाल्याने नद्या नाले तुडुंब भरले, शेतातही मोठ्या प्राणामात पाणी साचले आहे. यामुळे सोयबीन, कापूस, मुग यासारख्या पिकांना पिवळेपणा आला आहे. वडवणी आणि कवडगाव महसूल मंडळात झालेल्या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी समस्त शेतकर्‍यांनी केली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here