शाहजहांपूरमध्ये अवकाळी पावसाचा कहर, ऊस पीकाचे नुकसान

शाहजहांपूर, उत्तर प्रदेश :शाहजहांपूर जिल्ह्यातील काही भागामध्ये सोमवारी वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाचा मोठा कहर झाला. ज्यामुळे एका वृद्धाचा मृत्यु झाला आणि शेकडो एकर ऊस पीकाचे नुकसान झाले.

मोठया पावसामुळे शेकडो एकर उभ्या ऊसाच्या पीकाचे मोठे नुकसान झाले. खडगपूर चे शेतकरी राम अवतार कश्यप यांनी सांगितले की, माझ्या 150 एकर जमिनीत ऊसाची लागवड केली होती आणि दोन एकर जमीनीत तांदूळाची लावगड केली होती. पण मोठ्या पावसामुळे ही पीके खराब झाली आहेत. त्यांनी आरोप केला की, नुकसानीचे आकलन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कुणीही आमच्याशी संपर्क केला नाही. पीडित शेतकर्‍यांनी सांगितले की, शाहजहांपूर मध्ये ऑगस्टमध्ये पाऊस झाला नव्हता, जेव्हा याची आवश्यकता होती आणि त्यांना सिंचनासाठी जनरेटर चा उपयोग करावा लागला, ज्यामुळे त्यांना अतिरिक्त पैसा खर्च करावा लागला आणि आता अवकाळी पाऊस आणि वादळामुळे त्यांना मोठ्या नुकसानीला तोंड द्यावे लागले आहे. दरम्यान, एडीएम गिरिजेश कुमार चौधरी यांनी सांगितले की, “आमची पथके पावसामुळे खराब झालेल्या पिकांचे मूल्यांकन करतील आणि मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करतील.”.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here