राज्यातील धरणात पाण्याचे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढले

पुणे : गणेशोत्सवा दरम्यान, झालेल्या मुसळधार पावसाने पुन्हा एकदा महापुराची आठवण करुन दिली. या संततधार पावसामुळे राज्यातील धरणं दुथडी भरुन वाहू लागली. राज्यातील सहा विभागातील धरणांचा एकूण पाणीसाठा 70.37 टक्क्यांवर पोचला आहे. गतवर्षी हा पाणीसाठा 65.91 टक्के होता. काही भागात अजूनही पाउस असल्याने पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे. पण विदर्भ, अमरावती आणि मराठवाडा अजूनही तहानलेलेच आहेत.

पश्‍चिम महाराष्ट्रातील धरणांच्या पाणीसाठ्याच्या तुलनेत विदर्भ, मराठवाड्यातील धरणातील पाणीसाठा खूपच कमी आहे. अमरावती विभागातील धरणांमध्ये 41.98 टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी 57.69 टक्के पाणी शिल्लक होता. पण यंदा हे प्रमाण 20 टक्क्यांनी कमी झाले आहे. औरंगाबाद विभागातील धरणामंध्ये 37.28 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, जो गतवर्षी 27.97 टक्के होता. औरंगाबाद मध्ये पाणीसाठा दहा टक्क्यांनी वाढला आहे. कोकणात 89.72 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर गेल्या वर्षी हा पाणीाठा 92.14 टक्के होता. नागपूर विभागात सध्या 78.14 टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी 50.13 टक्के होता. मागील वर्षीपेक्षा सुमारे 72.61 टक्क्यांनी पाणीसाठा जास्त आहे. नाशिक विभागात सध्या 72.68 टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी 63.55 टक्के होता. तर पुणे विभागात सध्या 86.61 टक्के पाणीसाठा असून, मागील वर्षी 86.01 टक्के पाणीसाठा होता. मागील वर्षीच्या तुलनेत पुण्यात सुमारे एक टक्क्याने पाणीसाठा वाढला आहे.

राज्यातील जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून अतिवृष्टी सदृश्य पाउस पडला. या पावसामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यात महापूर आला. याबरोबरच पूर्व विदर्भातही अतिवृष्टी झाली, त्यामुळे धरणे शंभर टक्के भरुन वाहू लागली. मात्र, मराठवाडा आणि पश्‍चिम विदर्भात पाउस कमी झाल्याने पाणीसाठाही कमी असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here