ओम्रीॉकॉनचा धोका, महाराष्ट्रात लॉकडाऊनबाबत आरोग्य मंत्र्यांचे भाष्य

28

जेव्हा महाराष्ट्रात वैद्यकीय ऑक्सिजनची दैनंदिन मागणी ८०० मेट्रिक टनापर्यंत पोहोचेल, तेव्हाच राज्यात लॉकडाऊन लागू होऊ शकतो असे आरोग्य मंत्री, राजेश टोपे यांनी सांगितले. राज्य सरकारने कालपासून सार्वजनिक ठिकाणी रात्री नऊ ते सकाळी पाच या कालावधीत पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास निर्बंध लागू केले आहेत. कोरोना व्हायरसचे संक्रमण वाढत असल्याचे पाहून सार्वजनिक कार्यक्रमांसाठीही नियमावली लागू केली आहे.

राजेश टोपे यांनी जालना येथे सांगितले की, कोरोनाच्या ओम्रीकॉन व्हेरियंटचे रुग्ण गतीने वाढत आहेत. मात्र, रुग्णांना दवाखान्यात भरती करण्याची गरज नाही. अशा परिस्थितीत राज्यात तेव्हाच लॉकडाऊन लागू शकतो, जेव्हा ८०० मेट्रिक टन वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी वाढेल.

आम्हाला लॉकडाऊन लागू होऊ नये याची काळजी आहे. लोकांना दैनंदिन जीवनात कोणतेही अडथळे आणण्याची आमची इच्छा नाही. लोकांनी नियमांचे पालन करावे, मास्क वापरावा असे टोपे म्हणाले. सध्या ओम्रॉकॉनचे ११० रुग्ण राज्यात आहेत. तर ५७ जण यातून बरे झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here