नायजेरीया: डांगोट शुगरद्वारे १ बिलियन डॉलरची विस्तारीकरण योजना

अबुजा : सेंट्रल बँक ऑफ नायजेरियाच्या साखरेच्या तीन आयातदारांमध्ये स्थान मिळवल्यानंतर डांगोट शुगर रिफायनरी पीएलसीने (नायजेरीया) विस्तारीकरणावर १ बिलियन डॉलर खर्च करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.

Bloombergquint.com मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र सिंघवी यांनी गुंतवणूकदारांच्या एका परिषदेत सांगितले की, कंपनी १ लाख हेक्टर जमीन ऊस शेतीसाठी तयार करीत आहे. नायजेरीयाच्या उत्तरेकडील राज्ये अदमावा आणि नसरवामधील बागा २०२३ पर्यंत तयार होतील. तर अदमवा येथील एका साखर कारखान्याची क्षमता दुप्पट करून ६००० टन प्रती दिन गाळप करण्याबाबतचे काम सुरू आहे.
डांगोट फर्मच्या योजनेनुसार २०२४ पर्यंत दरवर्षी रिफाईंड साखरेची क्षमता १.५ मिलियनवरून २ मिलियन टनापर्यंत वाढविण्यात येईल. जूनपर्यंत ही क्षमता ४,०३,८६४ टन होती. उसाच्या शेतीमध्ये डांगोट साखरेला स्थानिक स्तरावर उत्पादनाचे स्रोत विकसित करणे, विक्रीत वाढ करण्यासाठी सक्षम बनविणार आहे. नायजेरीयाने परदेशी चलनात बचत करण्यासाठी साखर आयात बंद करण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू ठेवले आहेत.

सेंट्रल बँक ऑफ नायजेरीयाने एप्रिलमध्ये सांगितले की, गहू आणि साखरेच्या आयातीसाठीच्या परकीय चलनामध्ये कपात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या महिन्यात केवळ डांगोट शुगर आणि इतर दोन फर्म्सकडून कच्च्या मालाच्या स्थानिक सोर्सिंगमध्ये प्रयत्न झाले होते. त्यानंतर त्यांना आयातीस परवानगी देण्यात आली होती.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here