दरभंगा : रैयाम साखर कारखाना सुरू झाल्यास ५० हजार कुटूंबांना लाभ शक्य

दरभंगा : बंद पडलेला रैयाम साखर कारखाना सुरू झाल्यास केवटी विभागातील सुमारे ५० हजार कामगारांना लाभ मिळू शकेल, असे प्रतिपादन एमएसयूचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश भारद्वाज यांनी केले. विभागातील दडिमा गावातील चित्रगुप्त भवनातील नंद सभागृहात मिथिलावादी पार्टीच्या बॅनर अंतर्गत आणि एमएसयू केवडी विभाग युनिटच्या वतीने आयोजित नव लोकप्रतिनिधी मिलन कार्यक्रमात बोलत होते.

एमएसयूचे विभागाध्यक्ष प्रदीप झा या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आणि जिल्हा सचिव अमित मिश्र यांनी संचालन केले. युवा कवी प्रिय रंजन झा म्हणाले, मिथिलामधील शिक्षण व्यवस्थेचा बट्याबोळ झाला आहे. अनेक हायस्कूल्सना इमारती, शिक्षकांची कमतरता आहे. त्यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास दुर्लक्षीत राहीला आहे. जिल्हा सचिव अमित मिश्र म्हणाले की, मिथिलेतील पैसा लुटून मगधमध्ये नेला जात आहे. एमएसयू विभागाध्यक्ष झा यांनी दरभंगाला वाहतूक कोंडीतून सोडविण्यासाठी ओव्हर ब्रीजची गरज असल्याचे सांगितले. यावेळी विधान परिषदेचे आमदार शरत झा यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात बनसारा पंचायतीचे प्रमुख संजय कुमार यांना मिथिलावादी विभागाचे अध्यक्ष रामविलास पासवान यांना उपाध्यक्ष तर अभिषेक आनंद यांना संघटन सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले. यावेळी गुड्डू शर्मा, अनिल पासवान, त्रिभुवन पांडेय, नीरज कुमार, राघव झा, विकास साह, तारिक शम्स, रुपा देवी, कविता देवी, बृजेश साह, राजेश झा, रंजीत पासवान, दिनेश चौपाल आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here