आंदोलन मागे, ऊस वाहतूक पुन्हा सुरळीत

101

कुंभोज: आज दत्त सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी पुढाकार घेऊन जवाहर कारखाना वगळता चार कारखान्यांचे प्रतिनिधी व संघटनेचे प्रतिनिधी यांची बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढला. प्रामुख्याने नऊ टक्के दरवाढ देण्याची मागणी मान्य केल्याने सुरू असलेले बेमुदत आंदोलन मागे घेतले. त्यामुळे रस्त्यात व शेतात अडकून पडलेली ऊस वाहतूक सुरळीत झाली आहे.

शिरोळ हातकणंगले तालुक्यातील पाच साखर कारखान्यास ऊस वाहतूक करणाऱ्या श्रीदत्त ऊस वाहतूक संघटनेने दरवाढ मिळावी या मागणीसाठी सोमवारपासून बेमुदत ऊस वाहतूक बंद आंदोलनसुरू केले होते. यावर बैठकीतून चर्चा झाल्यामुळे अखेर तोडगा निघाला आहे.

या बैठकीस श्रीदत्त ऊस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजीराव पाटील नरदेकर, माधवराव पाटील, शिवाजी संकपाळ, प्रकाश कुंभार, संभाजी जाधव, हंबीराव पाटील, रावसाहेब आबदार, विनोद पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here