29 मे ला बंद होणार दौराला साखर कारखाना, शेतकऱ्यांनी ऊस लवकर घालावा कारखाना प्रशासनाची विनंती

दौराला : दौराला साखर कारखान्याने गाळप हंगाम 2019-20 ला ऊस कमी आल्यामुळे 29 मे ला कारखाना बंद करण्याची घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ऊसाची आवक कमी होत आहे, यामुळे कारखाना व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे.

दौराला ऊस समितीचे सचिव प्रदीप कुमार, ज्येष्ठ ऊस विकास निरीक्षक अमर प्रताप सिंह, ऊस व्यवस्थापक जेपी तोमर यांच्या बरोबर साखर कारखाना क्षेत्रातील सरधना, कालंद, दबथुवा, भूनी क्षेत्राला भेटी दिल्या. त्यांनी सांगितले की, जवळपास 136 ऊस खरेदी केंद्रे बंद झाली आहेत. इथला ऊस संपल्यामुळे हि केंद्रे बंद केली आहेत. साखर कारखाना महाव्यवस्थापक संजीव कुमार खाटियान यांनी सांगितले की, कारखाना गेटवर 24 मे पासून प्रतिबंधित मुक्त खरेदी केली जात आहे. 25 मे ला पहिली आणि 27 मे ला दुसरी बंदी नोटीस दिली होती. शेतकऱ्यांनी वेळेत ऊस घालावा यासाठी मुक्त खरेदी केली जात आहे. ज्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याचा ऊस शेतात राहू नये. महाव्यवस्थापकानि सर्व शेतकऱ्यांना विनंती केली आहे की, ज्यांच्या जवळ पुरवठा योग्य ऊस आहे त्यांनी 29 मे ला संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ऊस घालावा, कारण त्यानंतर कारखाना बंद होणार आहे. याशिवाय दौराला साखर कारखाना ऊस थकबाकी भागवण्यातही पुढे आहे. सरकारच्या 15 दिवसाच्या रोस्टर नुसार शेतकऱ्यांचे पैसे दिले जात आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here