साखर उद्योग विस्तारासाठी डीसीएम श्रीराम करणार गुंतवणूक

मुंबई : केंद्र सरकारच्या वतीने साखर उद्योग आणि इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे साखर उद्योगातील बड्या कंपन्या, व्यावसायिक गुंतवणूक करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. रसायन, साखर आणि खते उद्योगात विस्तारासाठी कार्यरत डीसीएम श्रीराम लिमिटेडने सोमवारी साखर कारखान्यांच्या विस्तारासाठी ३५० कोटी रुपयांच्या विस्ताराची घोषणा केली आहे.

डीसीएम श्रीरामने म्हटले आहे की, कंपनीने साखर व्यवसाय विस्तारासाठी तीन गुंतवणूक प्रस्ताव मंजूर केले आहेत.
उत्तर प्रदेशातील अजबपूर, रुपापूर, हरियांवा आणि लोणी येथे डीसीएम श्रीराम कंपनीचे साखर कारखाने आहेत. त्यांची प्रतिदिन गाळप क्षमता ३८,००० टीसीडी आहे. कंपनीने सांगितले की, तिन्ही विस्तार योजना ऑक्टोबर २०२२ पर्यंत सुरू होऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here