ऑनलाईन नोंदणीसाठी शेतकऱ्यांना ३० ऑक्टोबरपर्यंत मुदत

अटरिया : राज्यातील कोंडरिया येथील राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत लखनौच्या लाल बहाद्दूर शास्त्री ऊस शेतकरी संस्थेने शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नावनोंदणी करण्यासाठीची मदुत ३० ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे अशी माहिती लखनौ ऊस विभागाचे उपायुक्त सतेंद्र कुमार यांनी दिली. शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेऊन घोषणापत्र भरावे, अन्यथा यावर्षी तोडणी पावती दिली जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

ऊस संशोधन संस्थेचे विषयतज्ज्ञ अरुण कुमार म्हणाले, ऑक्टोबरमध्ये शेतकऱ्यांनी उसाची लागण करावी. यासोबतच कांदा, लसूण, धने, मटर आदी पिके घेतली जाऊ शकतात. त्यातून शेतकऱ्यांना दुहेरी लाभ मिळवता येईल. शेतकऱ्यांनी दरवर्षी एकदा आपल्या शेतातील मातीचे निश्चितपणे परिक्षण करून घ्यावे.

ऊस संशोधन संस्थेचे माजी संयुक्त संचालक डॉ. सुचिता सिंह यांनी सांगितले की, शरद ऋतुमध्ये लागण केलेल्या उसावर अंकुर कीटकांचा फैलाव होत नाही. इतर किडींचा, रोगांचा प्रभाव कमी पडतो. ज्या ठिकाणी पाणथळ जमीन आहे, अशा ठिकाणी ट्रायकोडर्माचा निश्चित वापर करावा. हैदरगड साखर कारखान्याचे मुख्य ऊस व्यवस्थापक शैलेंद्र मिश्र यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी निकोप स्पर्धा करत आपले उसाचे उत्पादन घेण्यासाठी ऊस विभागाच्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here