ऊस बिलांसाठी कारखान्यांना अंतिम मुदत, ऊस विभागाची कठोर भूमिका

186

कुशीनगर : गेल्या हंगामातील ऊसाचे पैसे न दिल्याने ऊस विभागाने कारखानदारांविरोधात कडक भूमिका घेतली आहे. पैसे न देणाऱ्या पाच कारखान्यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून ३१ मे ही अंतिम मुदत दिली आहे. तर खड्डा, कप्तानगंज आणि सेवरही या तीन कारखान्यांच्या साखर विक्रीवर निर्बंध लादण्यात आले आहेत.

या कारखान्यांना साखर विक्री करण्यापूर्वी परवानगी घ्यावी लागेल. साखरेच्या विक्रीतील ८५ टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा करावे लागेल. जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांपैकी सेवरही, रामकोला, कप्तानगंज, ढाढा आणि खड्डा यांनी एकूण २१५.३९ लाख क्विंटलचे गाळप केले होते. त्याचे मूल्य ६९३ कोटी ६८ लाख ७३ हजार होते. मात्र, फक्त ५३५ कोटी ३१ लाख रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. अद्याप शेतकऱ्यांचे १५८ कोटी ३७ लाख रुपये कारखान्यांकडे थकीत आहेत. उच्च न्यायालयाने चौदा दिवसांत पैसे देण्याच्या दिलेल्या निर्देशाचे उल्लंघन झाले आहे. पैसे दिल्याशिवाय हे कारखाने बंद झाले आहेत.

ढाढा साखर कारखान्याने ६२.२६ लाख क्विंटल उसाच्या १९९५८.८५पैकी १७१२७, रामकोला कारखान्याने ६३.६२ लाख क्विंटल उसाच्या २०५२२.९९ पैकी १९१२९.५ तर कप्तानगंज कारखान्याने २७.७५ लाख क्विंटल मूल्याच्या ८९८२.६४ च्या पैकी २९२४.७८ लाख रुपये, सेवरही कारखान्याने ४३.४५ लाख क्विंटलच्या १३९५९.८३ च्या पैकी ९४५२.३, खड्डा कारखान्याने १८.३१ लाख क्विंटल मुल्याच्या ५९४७.४६ लाख रुपयांपैकी ४८९७.७५ लाख रुपये थकीत ठेवले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

याबाबत शेतकरी हेमंत कुमार, पारसनाथ सिंह, विश्वनाथ सिंह पटेल यांनी सांगितले की, कारखाने वेळेवर ऊसाचे पैसे देत नसल्याने इतर पिकांकडे दुर्लक्ष होत आहे. इतर पिके पाणी आणि औषधांअभावी वाळत आहेत. शेतीच्या इतर कामासाठी पैसे उपलब्ध नसल्याची स्थिती आहे. याबाबत जिल्हा ऊस अधिकारी वेद प्रकाश सिंह यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या थकबाकीबाबत विभाग गंभीर आहे. यासाठी पाच कारखान्यांना नोटीस देऊन ३१ मे अखेरची मुदत दिली आहे. तीन कारखान्यांना विभागाची परवानगी घेऊनच साखर विक्री करावी लागेल. मुदतीत पैसे न देणाऱ्या कारखान्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here