भाकियू अराजकीयच्या बैठकीत थकीत ऊस बिलांवर चर्चा

मेरठ : भाकियू अराजकीयच्या मंडल प्रभारी तथा प्रदेश महासचिव विनोद जिटौली यांच्या नेतृत्वाखाली आयोजित विभागीय बैठकीत थकीत ऊस बिले, मोकाट जनावरांकडून होणारा उपद्रव, वीज बिल माफी आणि विंधन विहिरींवर बसवण्यात आलेली वीज मीटर या विषयावर चर्चा करण्यात आली. थकीत वीज बिलाबाबत सरकारकडे दाद मागण्याचा निर्णय घेण्यात आला.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, विनोद जिटौली यांनी सांगितले की, शेतकऱ्यांसाठी कुपनलिकांचे वीज बिल माफ करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यावर अंमलबजावणी झालेली नाही. किनौनी, मकलपूर, मोहिउद्दीनपूर, मवाना, सिंभावली, ब्रजनाथपूर साखर कारखाने ऊस बिले देण्यात अपयशी ठरले आहेत. त्यानंतरही कारखान्यांवर कारवाई करण्यात सरकार अपयशी ठरले आहे.

बैठकीनंतर शेतकऱ्यांनी विभागीय कार्यालयात धडक दिली. अप्पर आयुक्त हिमांशू शर्मा यांना निवेदन देण्यात आले. नरेश पाल बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्हाध्यक्ष नवाब सिंह अहलावत यांनी सूत्रसंचालन केले. नोएडा जिल्हाध्यक्ष महेंद्र मुखिया, हापुडचे पवन हुण, आकाश शिरोही, विपिन मलिक, मनोज त्यागी, हरेंद्र सिंह, पुनीत त्यागी. प्रदीप चौधरी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here