द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन तर्फे 65 व्या वार्षिक परिषदेचे आयोजन

पुणे: डीएसटीए अर्थात द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन पुणेच्या 65 व्या वार्षिक परिषदेचे आयोजन 1 आणि 2 ऑक्टोबर रोजी करण्यात आले असून मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजता, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के.पी. विश्वनाथा यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. यानिमित्त साखर उत्पादन संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे, अशी माहिती डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनचे प्रेसिडेंट मानसिंगराव जाधव आणि व्हाईस प्रेसिडेंट एस.एस. गंगावती यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संस्थेचे एक्झिकिटिव्ह सेक्रेटरी डॉ. एस. एम. पवार,  राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी संचालक डॉ. सुभाष शिंदे, श्रीकृष्ण देव, मुकुंद कुलकर्णी  आदी मान्यवर उपस्थित होते.

मानसिंगराव जाधव म्हणाले की, हॉटेल हयात रिजन्सी पुणे येथे ही दोन दिवसीय वार्षिक परिषद होत असून यावेळी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे महासंचालक शिवाजीराव देशमुख, कोईमतूर शुगर केन ब्रिडिंग  इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. बक्षीराम, कानपूर येथील नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटचे संचालक नरेंद्र मोहन, नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप.शुगर फॅक्टरीडचे कार्यकारी संचालक प्रकाश पी. नाईकनवरे तसेच महाराष्ट्रासह कर्नाटक आणि गुजरात राज्याच्या साखर आयुक्तांची प्रमुख उपस्थिती या राष्ट्रीय परिषदेला लाभणार आहे.

यावेळी साखर निर्मिती क्षेत्रात शून्यातून सुरुवात करून प्रभावशाली योगदान देणारे दौंड येथील नाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे चेअरमन पांडुरंग राऊत, कोल्हापूर येथील जवाहर एस.एस.के.चे कल्लाप्पा अवाडे,  उद्योग क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल निरानी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे समुह कार्यकारी संचालक संगमेश निरानी, तसेच व्यवस्थापन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल सुधाकर ठिगळे आणि श्रीकृष्ण देव, उत्पादन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल अजितसिंग पाटील, अभियांत्रिकी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल विजय खोत, कृषी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल मच्छिंद्र बोखरे, सहउत्पादन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल मोहन डोंगरे यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. तर संजीव माने, अशोक खोत, प्रद्युमन अतोदरिया आणि अशोक पाटील यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

एस.एस. गंगावती म्हणाले की, या परिषदेत यंदाच्या गुंडुराव मेमोरियल लेक्चर अंतर्गत कोईमतूर शुगर केन ब्रिडिंग इन्स्टिट्यूटचे डॉ. बक्षीराम यांचे ”दुष्काळरोधीत आणि उच्च उत्पादकता तसेच उच्च साखर उतारा देणाऱ्या उसाच्या जाती” या विषयावर व्याख्यान होणार आहे. तर जे.पी. मुखर्जी मेमोरियल लेक्चर अंतर्गत राष्ट्रीय शर्करा संस्थेचे संचालक नरेंद्र मोहन यांचे व्याख्यान होणार आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here