ऊसाचे प्रगत वाण असल्याचे सांगून नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक

लखनौ : उत्तर प्रदेशात नव्या ऊस बियाण्यांच्या नावावर फसवणूक सुरू आहे. शेतकऱ्यांना महागड्या दराने बियाणे ऊस माफियांकडून घ्यावे लागत आहे. याबाबत इंटरनेटवरही बनावट जाहिराती प्रसारीत करण्यात आल्या आहेत. याची गंभीर दखल घेत साखर उद्योग तथा ऊस विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय भुसरेड्डी यांनी अशा विक्रेत्यांवर बियाणे अधिनियमांतर्गत दंडात्मक कारवाईचे निर्देश दिले आहेत. विक्रेत्यांचा परवाना रद्द करण्यासह त्यांच्यविरोधात गुन्हेही दाखल करण्यात येतील. इंटरनेटवर फसवणूक करणाऱ्या जाहिराती पोस्ट करणाऱ्यांविरोधात सायबर ॲक्टनुसार कारवाई केली जाईल.

जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, अप्पर मुख्य सचिव संजय भुसरेड्डी यांनी सांगितले की, इतर राज्यांतून आणलेले ऊसाचे बियाणे राज्यातील सक्षम समितीकडून मान्यताप्राप्त नाही. अशा वाणांमुळे उत्पादनावेळी किड, रोगांचा प्रादु्र्भाव वाढण्याची शक्यता असते. यावर्षी ऑगस्ट महिन्यात दोन नवीन वाण मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये कोसी १७२३१ आणि युपी १४२३४ यांचा समावेश आहे. मात्र, अद्याप त्यांचे वितरण सुरू झालेले नाही. या नव्या बियाण्यांच्या नावावर माफियांकडून जादा दराने विक्री सुरू आहे. अशाच प्रकारे अद्याप परीक्षण सुरू असलेल्या कोएल १५२०१ आणि कोएल १६२०१ यांसह इतर राज्यांतील बियाण्याच्या नावावर बनावट विक्री सुरू आहे. याबाबत कारवाई सुरू करण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here