ऊस थकबाकी न भागवल्याने घेतला आंदोलनाचा निर्णय

बागपत : दोघट थाना क्षेत्रातील रहतना गावात, बुधवारी पप्पू मुखिया यांच्या निवासस्थानी ऊस थकबाकी भागवण्याच्या बाबत किनौनी कारखान्याविरोधात शेतकर्‍यांची पंचायत झाली.

पंचायतीमध्ये शेतकर्‍यांनी इशारा दिला की, जर एका आठवड्यांच्या आत पूर्ण थकबाकी न भागवल्यास शेतकरी आंदोलन करतील. किनौनी कारखान्याकडून ऊस थकबाकी न भागवल्यामुळे नाराज शेतकर्‍यांनी बुधवारी रहतना गावामध्ये नागरीकांची पंचायत झाली. पंचायत मध्ये शेतकर्‍यांनी आरोप केला की, किनौनी कारखान्यावर त्यांचे 305 करोड देय आहेत. कोरोनामुळे शेतकर्‍यांवर खूप मोठा परिणाम झाला आहे.

शेतकरी आपल्या मुलांचे शिक्षण, लग्न करु शकत नाहीत. सरकारही ऊस कारखान्यावर पैसे देण्यासाठी कोणताही दबाव टाकत नाही. तर सरकारचा दावा होता की, 14 दिवसांच्या आत जर पैसे दिले नाहीत तर त्या कारखान्यांनी त्यासोबत व्याजही दिले पाहिजे. पण सरकार शेतकर्‍यांना मुद्दलच मिळवून देत नाही. शेतकऱ्यांनी इशारा दिला की, विलंबाने केलेली थकबाकी व्याजासहित न मिळाल्यास कारखान्याविरोधात आंदोलन सुरु केले जाईल.

यासाठी किनौनी कारखाना परिसरातील शेतकर्‍यांशी संपर्क केला जाईल. तसेच एका आठवड्यानंतर मोठी पंचायत जिल्ह्यामध्ये कुठेही ठेवली जाईल. ज्यामद्ये अंतिम निर्णय घेतला जाईल. शेतकरी परिवाराचा कुटुंबप्रमुख एक दिवसाचे उपोषण करेल, हे शेतकर्‍यांनी निश्‍चित केले आहे. त्यानतंर आवश्यक असेल तर पूर्णशेतकरी कुटुंब उपोषण करेल. पंचायतीचे अध्यक्षस्थान श्रीनिवास त्यागी यांनी स्विकारले तर संचालन संजीव कुमार यांनी केले. यावेळी कालूराम त्यागी, बिजेपाल रंछाड, ओमवीर दादरी, सुमित कुमार चंदायन, राजेंद्र मुखिया, संजय कुमार, भीमसैन, नरेंद्र शर्मा, ओमवीर, धर्मवीर, रामशरण, पप्पू मुखिया आदी उपस्थित होते. या संदर्भात ऊस समिती सचिव दौराला प्रदीपकुमार यादव यांनी सांगितले की, किनौनी कारखान्याने जवळपास 600 करोड रुपयांचे 60 टक्के पैसे भागवले आहेत. अजूनही 305 करोड रुपये देय आहेत. ज्यासाठी कारखान्यावर दबाव टाकला जात आहे, जेणेकरुन शेतकर्‍यांची थकबाकी वेळेवर भागवली जावू शकेल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here