पंजाबमधील दोन सहकारी साखर कारखान्याच्या गाळप क्षमता वाढवण्याचा निर्णय

गुरदासपूर (पंजाब) : पंजाब सरकारने गुरदासपूर मध्ये एक अ‍ॅग्रीकल्चर कॉलेंज स्थापित करण्याबरोबर इथल्या बटाला आणि पनियार सहकारी साखर कारखान्यांची गाळप क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याचे स्वागत लोकांनी केले आहे. सरकारने शुक्रवारी सादर केलेल्या अंदाजपत्रकामध्ये याची घोषणा करताना सांगण्यात आले आहे की, या प्रकल्पा पासून शेतकर्‍यांना फायदा होईल तसेच क्षेत्रामध्ये ऊसाच्या शेतीला गती मिळेल. पंजाबचे कॅबिनेट मंत्री सुखजिंदर सिंह रंधावा यांनी साखर कारखान्यांची क्षमता वाढवण्याची शिफारस केली होती.

पंजाबचे मुख्यमंत्री कैप्टन अमरिंदर सिंह यांनी 2017 मध्ये आपल्या स्वातंत्र्य दिवस संबोधना च्या दरम्यान राज्यातील जनतेला या प्रकल्पाचे वचन दिले होते, जे आता पूर्ण होत आहेत. पंजाब सबऑर्डिनेट सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डचे अध्यक्ष रमन बहल यांनी यावर्षीच्या बजेटचे कौतुक करत या राज्याच्या विकासामध्ये एक माईलस्टोन असल्याचे सांगून ते म्हणाले, राज्य सरकारने आपल्या अंदाजपत्रकात कृषी, स्वास्थ्य आणि रोजगार सृजनासह सर्व क्षेत्रात पूर्ण लक्ष ठेवले आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here