थकबाकी न मिळाल्याने उत्तरप्रदेशमध्ये महापंचायतीचा इशारा

बिजनौर (उत्तरप्रदेश): राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेच्या बैठकीमध्ये ऊसाचे पूर्ण पैसे न मिळाल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. हे पैसे न मिळाल्यास ४ मार्च ला महापंचायत बोलवण्याचा इशारा देण्यात आला.

ऊस समिती परिसरात झालेल्या बैठकीत वेस्ट यूपी महासचिव कैलाश लांबा यांनी सांगितले की, शेतकऱ्यांची करोडो रुपयांची देणी साखर कारखान्यांकडून बाकी आहेत. वेव ग्रुपच्या साखर कारखान्याने अजून एक रुपयाही बाकी चुकवलेली नाही. त्यांनी सांगितले की, आता होळी तोंडावर आली आहे, प्रशासनाने होळीपूर्वी शेतकऱ्यांचे पूर्ण पैसे भागवले पाहिजेत. जिलाध्यक्ष विनोद कुमार म्हणाले, थकबाकी न भागवणाऱ्या साखर कारखान्यांविरोधात कुठलीच कारवाई होत नाही. विद्युत निगम आणि बँक थकबाकीदार शेतकऱ्यांना आरसी जारी केली आहे. जर शेतकऱ्यांना त्यांच्या पीकाचे मूल्यच जर एक वर्षानंतर मिळाले तर शेतकरी दर महिन्याला वीजेचे बिल कसे भरू शकणार. ते म्हणाले की, शतकऱ्यांचे शोषण सहन केले जाणार नाही. प्रशासनाने साखर कारखान्यांकडून शंभर टक्के थकबाकी भागवली पाहिजे, असे झाले नाही तर चार मार्चला कलक्ट्रेट मध्ये महापंचायत घेतली जाईल.

यावेळी अंकुर चौधरी, अचल शर्मा, राजपाल भगत, रीना देवी, उषा देवी, ठाक्कर सिंह, गोविंद सिंह, वेदप्रकाश, सचिन राठी आदी उपस्थित होते .

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here