मोदी सरकारला झटका: जीएसटी संकलनात घट

नवी दिल्ली: सप्टेंबर महिन्यातील वस्तू व सेवा कर (जीएसटी) संकलनात घट झाली असून, त्यामुळे मंदीसदृश्य वातावरणात सरकारी महसूलातही घट होत असल्याचे स्पष्ट झाले. देशाच्या अर्थव्यवस्थेत आलेल्या मरगळीचा जीएसटी संकलनासही मोठा फटका बसला आहे. सप्टेंबरमध्ये जीएसटी संकलन 91,916 कोटी रुपयांपर्यंत सीमित राहिले. जीएसटी संकलनातील 19 महिन्यातील ही फार मोठी घट आहे.

यंदाच्या अर्थिक वर्षात तिसर्‍यांदा जीएसटी संकलन कमी झाले आहे. यापूर्वी जून आणि ऑगस्ट महिन्यात अशी नामुष्की ओढवली होती. अर्थिक मंदीचा थेट परिणाम जीएसटी भरण्यावर झाल्याचे यातून दिसून येते. ऑगस्टमध्ये जीएसटी पोटी 98,202 कोंटी रुपये जमा झाले होते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जीएसटीमधून 94,442 कोटी रुपयांचा महसूल गोळा झाला होता. चालू महिना हा सणासुदीचा असल्याने या महिन्यात जीएसटीतून चांगले उत्पन्न होईल, अशी आशा तज्ञांनी व्यक्त केली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here