महाराष्ट्रात चालू हंगामात साखर उताऱ्यात घट

220

मुंबई: महाराष्ट्रातील गाळप हंगाम संपला आहे. मात्र, या हंगामात साखर उताऱ्यात घट झाल्याचे दिसून आले आहे. गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये साखर उतारा १०.५० टक्के राहीला. तर गेल्यावर्षी, २०१९-२० मध्ये उतारा ११.३० टक्के इतका होता.

सध्याच्या गाळप हंगामात १९० कारखाने सुरू होते. त्यामध्ये ९५ सहकारी तर उर्वरीत ९५ खासगी होते. त्यांची एकूण गाळप क्षमता ७,२८,४८० मेट्रिक टन होती. आधीच्या हंगामातील ५४५ लाख टनाच्या तुलनेत सध्याच्या हंगामात एकूण ऊस गाळप १०१२ लाख टन झाली.

राज्यभरातील साखर कारखान्यांनी १०६.२८ लाख टन साखरेचे उत्पादन केले. गेल्या हंगामाच्या तुलनेत हे उत्पादन अधिक आहे. तर गेल्या हंगामात ऊसाच्या कमतरतेमुळे १४७ कारखानेच सुरू होते. तर साखर उत्पादन ६१.६१ लाख टन होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here