गुजरातमध्ये या हंगामात साखर उत्पादनात झाली घट

गुजरात : देशातील काही राज्यांमध्ये ऊस गाळप अजूनही सुरु आहे. लॉकडाउनमुळे साखर कारखान्यांची अवस्था बिकट झाली आहे. उत्तर प्रदेशामध्ये आता सर्वात अधिक साखर कारखान्यांमध्ये गाळप सुरु आहे.

गुजरात च्या सर्व कारखान्यांनी चालू हंगामासाठी गाळप कार्य बंद केले आहे. आणि 2018-19 हंगामात उत्पादित 11.21 लाख टन साखरेच्या तुलनेत 9.28 लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. या हंगामात गुजरातमध्ये साखर उत्पादनात घट झाली आहे.

इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (इस्मा) च्यानुसार, देशभरात साखर कारखान्यांनी 1 ऑक्टोबर 2019 पासून 15 मे 2020 दरम्यान 264.65 लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. तेच गेल्या वर्षी च्या 326.19 लाख टनाच्या तुलनेत जवळपास 61.54 लाख टन इतके उत्पादन कमी आहे. 15 मे 2019 ला 38 साखर कारखाने ऊस गाळप करत होते, यावर्षी 15 मे 2020 ला 63 साखर कारखाने ऊस गाळप करत आहेत.

देशातील साखर कारखाने सध्या साखर विक्री ठप्प झाल्यामुळे आर्थिक संकटातून जात आहेत. आइस्क्रिम, कोल्डड्रिंक्स आणि चॉकलेट सारख्या विविध प्रकारच्या उत्पादनांच्या निर्मात्यांकडुन औद्योगिक वापरासाठी असणार्‍या मागणीत घट झाल्यामुळे साखरेची विक्री ठप्प आहे. याशिवाय साखरेच्या उपपदार्थांच्या विक्रीची गती कमी आहे ज्यामुळे साखर कारखान्यांसमोर उत्पनाची ची समस्या निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here