मदुराई जिल्ह्यामध्ये ऊसाच्या शेतीत घट

मदुराई, तामिळनाडू: जिल्ह्यामध्ये ऊसाच्या शेतीमध्ये यावर्षी घट झालेली दिसून आली आहे. कोविड 19 महामारीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या साखर कारखान्यांना थकबाकी भागवण्यात झालेल्या विलंबामुळे शेतकर्‍यांना ऊसाची शेती करण्याबाबत निराश केले आहे. तामीळनाडू ऊस शेतकरी संघाचे अध्यक्ष एन. पलानीचामी यांनी सांगितले की, अलंगनल्लूर स्थित नॅशनल को ऑपरेटिव साखर कारखान्याने फेब्रुवारीपासून ऊस शेतकर्‍यांना जवळपास 1 करोड ची थकबाकी दिलेले नाही. याशिवाय, कारखान्याने दोन वर्षांपासूनचे ऊसावरील एकूण 19 करोड रुपयांच्या राज्य सल्लागार मूल्याचे पैसे भागवलेले नाहीत.

थिरुमंगलम ब्लॉक येथील थिरुमल गावातील एका शेतकर्‍याने सांगितले की, अनेक शेतकर्‍यांनी ऊस तोडण्यासाठी मजुरांना पैसे देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतले होते. पण थकबाकीचे पैसे न मिळाल्याने हे कर्ज चुकवले गेले नाही. ज्यामुळे शेतकर्‍यांचे खूप नुकसान झाले आहे, यासाठी, शेतकर्‍यानीं ऊसाची शेती कमी केली आहे. अनेक शेतकरी आपले कर्ज चुकवण्यासाठी संघर्ष करत आहेत. अनेक शेतकर्‍यांनी कापूस, केळी आणि शेंगदाण्यासारख्या इतर पिकांची शेती करण्याचा पर्याय निवडला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here