जमिनीचा पोत कायम राखण्यासाठी उसाचे पाचट शेतातच कुजवा : ‘राजारामबापू’चे अध्यक्ष प्रतीक पाटील

सांगली : गावोगावी क्षारपड जमिनीचे क्षेत्र मोठया प्रमाणात वाढत आहे. शेत जमिनींचा पोत दिवसेंदिवस खराब होत चालला आहे. त्यातून शेतीची उत्पादकता झपाट्याने कमी होत आहे. जमिनीचा पोत कायम राखण्यासाठी, तो वाढविण्यासाठी ऊसाचे पाचट जाळू नका. ते शेतातच कुजवा, असे आवाहन राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी केले. कारखान्याने यासाठीची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेच्या प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते.

कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील, खरेदी समितीचे अध्यक्ष देवराज पाटील, शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, बांधकाम समितीचे अध्यक्ष कार्तिक पाटील, जलसिंचन समितीचे अध्यक्ष प्रदीपकुमार पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. इस्लामपूर, आष्टा शहरासह वाळवा तालुक्यात जनजागृती फलक लावले आहेत. याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना प्रतीक पाटील म्हणाले, पाचटाचे सरीत आच्छादन करायला हवे. त्यामुळे खोडव्याची उगवण क्षमता ८२ टक्के राहते. एक हेक्टर ऊस क्षेत्रातून ७ ते १२ टन पाचट तयार होते. पाचटातून ५.४ किलो नत्र, १.३ किलो स्फुरद, ३.१ किलो पालाश आणि अन्य सूक्ष्म मूलद्रव्ये मिळतात. तण नियंत्रणाचा खर्च कमी येतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here