मान्सून रखडल्याने उत्तर प्रदेशातील निम्म्या जिल्ह्यांत कमी पाऊस

लखनऊ: उत्तर प्रदेशमधील निम्म्या जिल्ह्यांमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस झाला आहे. दक्षिण-पश्चिम मान्सून रखडत चालल्याने गेल्या वीस दिवसांत राज्यात कमी पाऊस झाला आहे. राज्यातील ७५ पैकी ३८ जिल्ह्यांमध्ये मान्सूनची सरासरी २८ टक्क्यांपेक्षा कमी नोंदण्यात आली आहे. तर फक्त १८ जिल्ह्यांमध्ये सामान्य सरासरीइतका पाऊस झाला आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागातील जिल्ह्यामध्ये पूर्व उत्तर प्रदेशच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे. उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात एक जून ते आठ जुलै या कालावधीत सरासरी ८० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सामान्य क्षमतेच्या १२३.७ मि.मी. पावसापेक्षा हे प्रमाण ३५ टक्क्यांनी कमी आहे.
याबाबत प्रसार माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार, सर्वात कमी पावसाच्या जिल्ह्यांमध्ये गौतम बुद्ध नगर (७९ टक्के), गाझियाबाद (८४ टक्के), इटावा (७२ टक्के), ललितपूर (८२ टक्के), अलिगड (५२ टक्के), औरेया (४९ टक्के), बागपत (६४ टक्के), बुलंदशहर (६२ टक्के), मथुरा (६१ टक्के), महोबा (६१ टक्के), सहारनपूर (६९ टक्के), शामली (६१ टक्के), फरुखाबाद (७४ टक्के) यांचा समावेश आहे. यातील बहुसंख्य जिल्ह्यात भात आणि ऊस हीच मुख्य पिके आहेत. कमी पावसामुळे खरीप पिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

भाताच्या शेतीला पहिल्या ५० दिवसांत जादा पाण्याची गरज असते. मात्र, यावेळी पाऊस थांबत थांबत पडत असल्याने शेतकऱ्यांना विहिरी, विंधन विहिरींवर अवलंबून राहावे लागले आहे. पुन्हा पाऊस सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्याच्या अखेरीस पाऊस पुर्ण राज्यभर पसरेल. गुरुवारी पूर्व उत्तर प्रदेशच्या काही जिल्ह्यातल मान्सूनच्या पावसाला पुन्हा सुरुवात झाली होती.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here