देहरादून: खूप वाट पहायला लावल्यानंतर सरकारने ऊसाची आधारभूत किंमत घोषित केले आहे. हि किंमत गेल्या वर्षाप्रमाणेच आहे आणि यामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ केलेली नाही. ऊसाच्या उच्च वाणांसाठी 327 रुपये आणि सामान्य वाणांसाठी आधारभूत किंमत 317 रुपये प्रति क्विंटल ठेवण्यात आली आहे. ही किंमत उत्तर प्रदेशाच्या ऊस आधारभूत किमतीपेक्षा दोन रुपयांनी जास्त आहे.
आधारभूत किंमत जाहीर न झाल्यामुळे साखर कारखान्यांमध्ये किंमत नसलेल्या पावतीवर शेतकर्यांचा ऊस घेतला जात होता. अशामध्ये ऊस उत्पादकांना आशा होती की, यावेळी सरकार आधारभूत किंमती मध्ये वाढ करेल, पण असे झाले नाही. आधारभूत किंमत गेल्या वर्षीप्रमाणेच ठेवण्यात आली आहे. आधारभूत किंमती संदर्भात आदेश दिले आहेत. यानुसार, कारखान्याच्या गेटवर उच्च वाणांसाठी 327 व सामान्य वाणांसाठी 317 रुपये प्रति क्विंटल दर निश्चित केला आहेत.
या आदेशानुसार साखर कारखान्यांच्या बाह्य केंद्रांकडून कारखान्याकडे ऊस वाहतुकीची कपात मागील वर्षी प्रमाणे 11 रुपये प्रतिक्विंटल निश्चित करण्यात येणार आहे. राज्यातील सहकारी, शासकीय व खासगी क्षेत्रातील सर्व साखर कारखानदारांकडून हाच ऊस दर देय असेल. चालू गाळप हंगामात साखर कारखानदारांकडून त्याच दराने शेतकर्यांना पैसे दिले जातील.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.