देहरादून: विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर काॅंग्रेसचे ऊस हातात घेऊन आंदोलन

देहरादून: उत्तराखंड विधानसभेत आज अर्थसंकल्पीय सत्राचा पाचवा दिवस आहे. आज भैरारीसैंण येथील विधानसभा भवनाच्या प्रवेशद्वारावर काॅंग्रेसच्या आमदारांनी ऊस दरवाढीसाठी थेट ऊस हातात घेऊन आंदोलन केले. महागाईचा आगडोंब उसळला असून पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. मात्र सरकारने ऊस दर वाढवले नाहीत असा आरोप त्यांनी केला.

काल मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी विधानसभेत २०२१-२२ साठीचे बजेट सादर केले. ५७४०० ३२ कोटी रुपयांचा हा करमुक्त आणि उत्पन्नवाढ असलेला हा अर्थसंकल्प आहे असे त्यांनी सांगितले. सरकारने विकास कामे, रस्ते आणि पुलांची निर्मिती यासाठी मोठा निधी दिला आहे. लोकविकासाच्या कामांसाठी २३६९ कोटींचे बजेट आहे. पहिली ते आठवीच्या विद्यार्थिनींसाठी मोफत बूट आणि दफ्तर देण्याचा निर्णय जाहीर केला. शहरी भागात प्रत्येक घराला पाणी देऊ असे सांगून अर्थसंकल्प सर्वसमावेशक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here