दिल्ली तापली : पारा ३७ डिग्रीपर्यंत पोहोचणार, आयएमडीचा इशारा

नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आता उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून दुपारच्या तापमानात मोठी वाढ दिसून आली आहे. तापमान नवा उच्चांक प्रस्थापित करत आहे. रात्री हलक्या थंडीचा अनुभव येतो. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे की, आता उन्हाच्या झळा अधिक तीव्र होतील. आगामी काही दिवसात पारा वाढणार आहे. रविवारी दिल्लीत कमाल तापमान ३४.८ डिग्री सेल्सिअस होते. गेल्या काही दिवसांत हे सर्वाधिक तापमान आहे. आज, मंगळवारीही कमाल तापमान ३५ आणि किमान तापमान १६ डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहील असे आयएमडीने म्हटले आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, उद्या बुधवारी किमान तापमान एका अंशाने वाढून १७ डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचेल. आठवड्याच्या अखेरीस म्हणजे शनिवारपर्यंत तापमान वाढून १८ डिग्रीवर जाईल. कमाल तापमान ३७ डिग्री सेल्सिअसवर जाईल. मात्र, या संपूर्ण आठवडाभर काहीसे ढगाळ आकाश राहील असे आयएमडीने म्हटले आहे. दिल्लीलगतच्या नोएडामध्येही किमान तापमानात मोठी वाढ दिसून आली आहे. आयएमडीच्या म्हणण्यानुसार, येथील किमान आणि कमाल तापमान शनिवारपर्यंत वाढून २३ आणि ३८ डिग्रीपर्यंत पोहोचेल. ११ ते १३ एप्रिलपर्यंत दिवसा जोरदार वारे वाहू शकते. गुरुग्रामची स्थितीही दिल्ली सारखीच आहे. येथील तापमान शनिवारपर्यंत १८ आणि ३७ डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचेल. आठवड्यातील काही दिवस ढगाळ वातावरण राहील, असे आयएमडीने स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here