दिल्लीत पावसाचा १२१ वर्षातील नवा उच्चांक, १९०१ नंतर यावर्षी सर्वाधिक पाऊस

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत यंदा आतापर्यंत१,५०२.८ मिमी पाऊस झाला आहे. एखाद्या वर्षात दिल्लीत होणारा हा उच्चांकी पाऊस आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राजधानीत १९३३ मध्ये १४२०.३ मिमी पाऊस झाला होता. १९०१-२०२१ या कालावधीत एखाद्या वर्षी झालेला हा सर्वाधिक पाऊस आहे. राजधानीत १९३३, १९६४, १९७५ नंतर चौथ्यांदा १२०० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

सफदरजंग वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळपर्यंत १५०२.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. एका अधिकाऱ्यांना १९०१ नंतर हा सर्वाधिक पाऊस असल्याचे सांगितले. दिल्लीत गेल्यावर्षी ७७३.२ मिमी पावसाची नोंद झाली होती. खासगी हवमाना एजन्सी स्कायमेट वेदरचे उपाध्यक्ष महेश पलावत यांनी सांगितले की, यावर्षी दिल्लीत आणखी पावसाचा उच्चांक दिसू शकतो. पश्चिम वाऱ्यांच्या प्रभावाने स्थिती बदलली आहे.

दिल्लीत सप्टेंबर महिन्यात ४१३.३ मिमी पावसाची नोंद झाली. त्यानंतर या महिन्यात चांगला पाऊस झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here