मुंबई : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या डेल्टा प्लस व्हेरियंटने चिंता वाढवली आहे. देशात आढळलेल्या या व्हेरियंटचे जादा रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्राच्या डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्चचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडे सादर झालेल्या अहवालातून ही बाब समोर आली आहे.
एप्रिल महिन्यात महाराष्ट्र सरकारने काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च (सीएसआयआर) आणि इन्स्टिट्यूट ऑफ जेनॉमिक्स अँड इंटिग्रेटीव्ह बायोलॉजी यांच्यासोबत दर महिन्याला सर्व जिल्ह्यांतील १०० नमुनेच्या जीनोम सिक्वेंसिंग करण्यासाठी एमओयू करण्यात आला आहे. त्या अंतर्गत ही बाब उघड झाली.
माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार, देशभरातील नमुन्यांतील १५ ते २० डेल्टा व्हेरियंट्चे रुग्ण मिळाले आहेत. त्यापैकी ८ रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. हे डेल्टा प्लस व्हेरियंट रत्नागिरी, नवी मुंबई आणि पालघरमधील आहेत. मात्र, यापैकी कोणीही गंभीर नाही. रुग्णांमध्ये माइल्ड नमुने आहेत. आणखी काही नमुने जिनोम सीक्वेसिंगसाठी पाठवले आहेत. आरोग्य विभागाच्या बैठकीत या अहवालावर चर्चा होईल. डेल्टा व्हेरियंटच्या वाढत्या धोक्याबाबत राज्याच्या टास्क फोर्सकडून गाईडलाइन्स तयार केल्या जातील अशी अपेक्षा आहे.
दिल्लीस्थित नॅशनल सेंटर फॉर डिसिज कंट्रोलचे संचालक डॉ. सुजित सिंह यांनी सांगितले की, या व्हेरियंटवर लक्ष देण्याची गरज आहे. ते म्हणाले, आम्हाला तामीळनाडू, महाराष्ट्र, पंजाब, मध्य प्रदेशसह अनेक राज्यांतून १५-२० डेल्टा प्लस व्हेरियंट मिळाले आहेत. सद्यस्थितीत डेल्टा डॉमिनंट आणि ताकदवार व्हेरियंट आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link