इंडोनेशियामध्ये डेल्टा व्हेरियंटचा कहर, ऑक्सिजनअभावी अनेकांनी गमावले प्राण

जकार्ता: भारतात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला होता. आता इंडोनेशियामध्ये डेल्टा व्हेरियंटचा कहर सुरू आहे. येथे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्ण हॉस्पिटलमध्ये जीव सोडत असल्याची स्थिती आहे. ऑक्सिजनअभावी शनिवारी ६३ लोकांना प्राण गमवावे लागले.

इंडोनेशियाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. जॉन हाफकिन रिसर्च सेंटरने सांगितले की देशात गेल्या आठवड्यात उच्चांकी ३२९८ जणांचा मृत्यू झाला. सोमवारी इंडोनेशियात कोरोनाचे नवे २९,७४५ रुग्ण आढळले. आणि ५५८ जणांचा मृत्यू झाला. जावामध्ये डेल्टा व्हेरियंटचा धोका वाढला असून ऑक्सिजन कमतरतेमुळे रुग्णांच्या मृत्यू संख्येत वाढ झाली आहे. ऑक्सिजनच्या पुरवठ्यात घट झाल्याने त्याची किंमतही दुप्पट झाली आहे. अंत्यसंस्कार वाढले असल्याचे जकार्ता सरकारने मान्य केले आहे. शनिवारी ३९२ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. जावामध्ये आरोग्य आणिबाणी जाहीर करण्यात आली आहे.

चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here