‘साखर कारखान्यांच्या गैरव्यवहाराची सीबीआय चौकशी करा’

785

चेन्नई : चीनी मंडी

तमीळनाडू राज्यातील दोन साखर कारखान्यांनी बँकांची आणि शेतकऱ्यांची फसवणूक करून मोठा गैरव्यवहार केल्याचा आरोप करत तंजावर जिल्हा कावेरी शेतकरी संरक्षण संघटनेने या गैरव्यवहाराची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. या दोन साखर कारखान्यांनी बँकांची फसवणूक करून ३५० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला आणि शेतकऱ्यांना कर्जबाजारी केले, असा आरोप संघटनेने केला आहे.

कुंबाकोनम येथे संघटनेची विशेष बैठक झाली. तेथे ३५० कोटी रुपयांच्या गैव्यवहाराला वाचा फोडण्यात आली. विभागातील दोन साखर कारखान्यांनी २०१६-१७ या वर्षी राष्ट्रीय आणि खासगी बँकांची फसवणूक केली आणि शेतकऱ्यांची दिशाभूल केली, असा आरोप करण्यात आला आहे. गैरव्यवहार करणाऱ्यांनी गोरगरिब शेतकऱ्यांकडून एका फॉर्मवर सह्या घेतल्या आहेत. ऊस तोडणी आणि वाहतूक कर्जाच्या माध्यमातून बँकांच्या कर्ज योजनेचाल लाभ शेतकऱ्यांना मिळेल, असे त्यावेळी सांगण्यात आले. पण, कर्जाची रुक्कम खासगी साखर कारखान्यांच्या खात्यावर वर्ग झाली आणि कर्ज फेडण्याची जबाबदारी गरीब शेतकऱ्यांवर आली आहे.

या संदर्भात कर्जाची परतफेड करण्याच्या नोटिस शेतकऱ्यांना आल्यानंतरच या प्रकाराची माहिती शेतकऱ्यांना मिळाली. कर्जाचे पैसे भरले नाही तर, कारवाई करण्याचा इशाराही बँकांकडून देण्यात आला आहे. या नोटिस मिळाल्यानंतर जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांना या प्रकाराची माहिती देण्यात आली. त्यावर कोणतिही कारवाई होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर संघटनेने सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली. राष्ट्रपती आणि राज्यपालांकडे ही लेखी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात कोर्टात दाद मागितलेल्या शेतकऱ्यांचेही संघटनेने आभार मानले आहेत.

डाउनलोड करे चीनीमंडी न्यूज ऐप:  http://bit.ly/ChiniMandiApp  

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here