सर्व ऊस खरेदीनंतरच कारखाना बंद करण्याची मागणी

शांतीपुरी : किच्छा साखर कारखान्याने लवकर ऊस खरेदी बंद केल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी आंदोलन केले. विभागातील सर्व शेतकऱ्यांच्या उसाची खरेदी केल्यानंतरच कारखाना बंद करावा अशी मागणी त्यांनी केली. रविवारी शेतकऱ्यांनी शांतीपुरी येथील ऊस खरेदी केंद्रासमोर निदर्शने केली.

काँग्रेसचे नेते डॉ. गणेश उपाध्याय यांनी सांगितले की, शांतीपुरी क्रमांक एक, जवाहरनगर सह विभागातील शेतकऱ्यांना मजुरांची समस्या भेडसावत आहे. कडक उन्हात थांबून केंद्रांवर उसाचे वजन करण्याची वेळ त्यांच्यावर वेळ आली आहे. आता साखर कारखान्यांनी ऊस खरेदी बंद करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. जर शेतकऱ्यांचा एक क्विंटल उसही वजन केल्याशिवाय कारखाना बंद केला तर प्रशासनाच्या कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल. प्रत्येक शेतकऱ्याच्या उसाचे वजन करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.

किच्छा साखर कारखान्याने शेतकऱ्याना फक्त ५१ कोटी रुपये बिल दिले आहे. तर ६२ कोटी रुपयांची ऊस बिले थकीत आहेत. सद्यस्थितीत गव्हाच्या कापणीचा हंगाम सुरू आहे. भाताचे पैसेही अद्याप मिळालेले नाहीत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. यावेळी महेश चंद, गणेश जोशी, सुरेश भाकुनी, नंदन देउपा, चंदन सिंह चौहान, मुनीम पांडेय, दिलीप, हरीश आदी शेतकरी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here